पोलीस अधिकाऱ्यालाच 5,हजाराची लाच देणाऱ्या तरुणाला अटक PSI यांनी एलसीबी कडे केली होती तक्रार कडेगाव येथील घटना

कडेगाव– येथील घटना भावा विरोधात केलेल्या अर्जानुसार गुन्हा दाखल करून ,5, हजाराची लाच घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याला आग्रह करणाऱ्या तरुणाला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले कडेगाव येथे मंगळवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली विशेष म्हणजे या अधिकाऱ्यालाच लाच घेण्याचा आग्रह करून त्याच्या विरोधातच त्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली अभिजीत नारायण गोरड वय ,36 ,राहणार उपाळे मायणी ता कडेगाव, असे अटक केलेल्या चे नाव आहे गोरड, याने कडेगाव पोलीस ठाण्यात भावाविरोधात तक्रार अर्ज केला होता त्या अर्जानुसार गुन्हा दाखल करून त्यासाठी 5, हजाराची लाच घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याला आग्रह त्याने धरला होता त्या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेण्याचा आग्रह करून त्याच पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात त्याने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती मात्र गोरड लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार संबंधित पोलीस अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती मात्र तक्रारदार पोलीस अधिकाऱ्याला लाच घेणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत गोरड यांच्या विरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती विभागाने याची पडताळणी केल्यानंतर गोरड, 5, हजाराची लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर मंगळवारी दुपारी गोरड याला लाच देताना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शासकीय निम शासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास,9821880737, या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उप अधीक्षक पाटील यांनी केले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रय पुजारी प्रीतम चौगुले धनंजय खाडे अजित पाटील सलीम मकानदार रामहरी वाघमोडे ऋषिकेश बडनीकर उमेश जाधव सुदर्शन पाटील सीमा माने अतुल मोरे चंद्रकांत जाधव विना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली एक नवीन