प्रा,स्वप्नील प्रशांत गरुड यांचा रावळगांव येथे नागरी सत्कार सोहळा
संपादक सोमनाथ मानकर

वामनदादा गरुड यांच्या साहित्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने नुकतीच प्रा.डॉ.स्वप्निल प्रशांत गरुड यांना पीएच.डी पदवी प्रदान केली.या निमित्तानं #रिपब्लिकन_पार्टि #आॕफ_इंडिया_ईगल_सोशल_ग्रुप नागरी सत्कार समिती यांनी नागरी सत्कार आयोजित केला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र #देवराजजी_गरुड हे होते.प्रमुख पाहुणे #मा_अद्वय_आबा_हिरे यांच्या हस्ते डॉ.स्वप्निल गरुड यांचा नागरी सत्कार करण्यात आला.प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर,प्रा.डॉ.अर्जुन नेरकर,प्रा.अजय अहिरे, प्रा.चंद्रकांत दाणी उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.नेरकर म्हणाले अप्रकाशित साहित्यावर पीएच.डी मिळवण इतके सोपे नाही आणि हे दिव्य इतक्या कमी वयात साहित्यावर डॉक्टरेट मिळवणारे डॉ.स्वप्निल गरुड हे रावळगावातील पहिले आहेत.ही या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.वामनदादा गरुड यांचे साहित्य पुस्तक रुपाने समाजासमोर यावे आणि त्यांच्या नवविचारांनी परिवर्तन व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.या नंतर डॉ.विनोद गोरवाडकर म्हणाले स्वप्निल हे सुर्याचे नाव आहे सुर्य जसा सर्वांना प्रकाश देतो तसेच स्वप्निलने केलेले हे संशोधनाचे काम येणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रि.पा.इ जिल्हाध्यक्ष #प्रशांत_दादा_गरुड यांनी केले.सत्काराला उत्तर देताना डॉ.स्वप्निल गरुड म्हणाले की आजही जुन्या रुढी,परंपरा ,अंधश्रध्दा बंद व्हायला तयार नाहीत. त्यामुळे वामनदादा गरुड यांच्या साहित्याची त्यांच्या प्रबोधनात्मक गीतांची आजही समाजाला गरज आहे.तरच परिवर्तन शक्य आहे.रावळगावकरांनी भरभरुन माझे कौतुक केले त्याबद्ल त्यांचा सदैव मी ऋणी राहिल. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आयु.महेंद्र अहिरे यांनी केले.या प्रसंगी गावातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सर्व संघटना,व्यापारी वर्ग,शिक्षक,प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.