
नाशिक रोड येथील वीर सावरकर उड्डाण पुलाखाली चोरीचे फोन विकण्यासाठी मोबाईल चोर येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली असल्याने त्याच्या आधारे पथकाने सापळा रचून दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून अजय राजेंद्र गरुड,( सिन्नर) व विक्रम त्रंबक लहाने, (सिन्नर) असे दोघांचे नाव आहे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस हद्दीतून पायी चालत जाणाऱ्या कडून त्यांना धमकावून मोबाईल पळविण्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही गुन्हेगारांना मुद्देमालासह मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन केले.