
लासलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद भोसले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.भीमा कोरेगाव दंगलीतील ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे.
ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे.
येवला शहराचे नाव येवला मुक्ती भूमी करण्यात यावे. रमाई घरकुलाच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी.
SCआणि ST यांच्या उद्योग निधीमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच त्याकरिता कमी कागदपत्रांची पूर्तता घेण्यात यावी.
बेरोजगार SC आणि ST समाजाच्या मुलांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यात यावे.
ॲट्रॉसिटी कायदयाची अंमलबजावणी कडक करण्यात यावी.
भीमसैनिक श्री.विनोद भाऊ भोसले यांचे उपोषण समाजाच्या मागण्यांसाठी लासलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी चालू आहे.त्यांची तब्येत ढासळत चालली आहे,तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने सदर उपोषणाची दखल घेऊन समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .एक समाज म्हणून विनोद भाऊ भोसले यांना आपण पाठिंबा देण्याची वेळ आली आहे असे मत लासलगाव सह आजूबाजूच्या गावातील समाजातील तरुणांमध्ये आहे.इतके दिवस पक्षांसाठी झटलो आता जातीसाठी निळा झेंड्याखाली एकत्र येण्याची गरज आहे “जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी ” असा ठाम निर्धार श्री.विनोद भाऊ भोसले यांनी केला आहे.