
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाणारी लासलगाव बाजार समिती ला दिनांक: 23/6/2023 रोजी लासलगाव बाजार समिती व लासलगाव पोलीस स्टेशन यांना लेखी पत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही सदर पत्रात लासलगाव बाजार समितीतून विक्री केलेला कांदा हा घेतलेल्या व्यापाऱ्यांनी खाली करण्यासाठी कोटमगाव रोडवरील बागवान खळे, कदम काटा, बालाजी काटा या रस्त्या लगत तासंतास वाहनांची गर्दी असते संबंधित व्यापाऱ्यांना सांगून सुद्धा ते अरे-रवीची भाषा करतात. सदर रस्त्याने कोटमगाव, लासलगाव,माळेगाव, वनसगाव, उगाव, सारोळा येथील शालेय विद्यार्थी ,शेतकरी मजूर ये जा करतात काही हॉस्पिटलच्या कामासाठी येतात अशा अतिप्रसंगाच्या वेळी तासंतास थांबावे या गर्दीत थांबावे लागते.
पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर चिखल असतो प्रवास करताना गर्दी असल्यामुळे वाहने चिखलातून घालावे लागतात कित्येक प्रवासी पडतात हा जीव घेना प्रवास किती दिवस सहन करावा यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाल्यास कोण जबाबदार राहणार ? असा प्रश्न जनता करत आहे .स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा यावर तोडगा निघत नाही लवकरात लवकर स्थानिक पोलीस स्टेशन व बाजार समिती यांनी निर्णय घ्यावा. शेतमाल विक्री झालेले वाहने रस्त्याच्या खाली एक रांगेत लावावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार नाही. या विषयावर कुठलाही निर्णय न लागल्यास कोटमगाव ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी रास्ता रोको करण्यात येईल संबंधित घटकांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा ही विनंती. याचबरोबर कोटमगाव येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना 10 ते 10.30 दरम्यान शालेय बसची गैर सोय होती. बस सुरू करण्यात यावी. यासंदर्भात लासलगाव बस स्थानकात डेपो मॅनेजर काळे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कोटमगावचे उपसरपंच श्री. योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष गांगुर्डे, श्री. श्रावण काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रामदास मामा गांगुर्डे, श्री. हरिभाऊ कडाळे. श्री. शाहू महाराज कडाळे तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ निफाड तालुका सहसंघटक, न्यायभूमी न्युज, पोलीस टाईम्स न्यूज 24/7 चे पत्रकार श्री. ज्ञानेश्वर भवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते