संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता वेळीच स्थलांतरित व्हा व प्रशासनास सहकार्य करा…मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर
प्रतिनिधी शितल कांबळे

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून पूर बाधित परिसरातील कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करा व धोका वाढण्याआधीच सुरक्षित ठिकाणी अथवा निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित व्हा अशा सूचना मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हालोंडी व शिरोली गावातील पूर परिस्थिती पाहणी दरम्यान तेथील नागरिकांना केल्या.
यावेळी शिरोली पोलीस स्टेशनचे सह.पोलीस निरीक्षक पंकज गिरी, महेश चव्हाण, विजय भोसले, जे बी पाटील, महावीर सोनुरे, विनोद कटके, अशोक पाटील, किरण कांबळे, सुरेश यादव, राजकुमार पाटील, विजय पोवार, नितीन चव्हाण व इतर नागरिक उपस्थित होते.