
चिंचखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड येथील 2011 ला रुजू झालेले उत्कर्ष बालाजीराव कोंडावार यांनी आपल्या नोकरीची सुरुवात चिंचखेड गावापासून केली. 12 वर्षाचा तप पूर्ण करीत असताना विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी शैक्षणिक कामकाजा बरोबरच संगीत, नृत्य, खेळ या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रगत करून वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना मदत करून शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्यांचे व विद्यार्थ्यांचे नाते वडील आणि मुलाप्रमाणे असायचे. श्री कोंडावार सर यांची बदली चिंचखेड येथून चांदवड तालुक्यातील नवापूर या गावी झाल्याने शालेय व्यवस्थापन समिती चिंचखेड,ग्रामपंचायत चिंचखेड,विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चिंचखेड, पालक,शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी सरपंच मीनाक्षीताई गुंबाडे अध्यक्ष स्थानी होत्या कादवा कारखान्याचे माजी संचालक टि के संधान सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पाटील, माजी सरपंच सुभाष मातेरे, दत्तात्रय किसन संधान, सोसायटी चेअरमन प्रवीण पाटील, सोमनाथ मातेरे, पांडुरंग फुगट, गायकवाड बाबा, भास्करराव पाटील संधान बालाजी मित्र मंडळाचे सदस्य भारत भाऊ संधान व त्यांचे मित्र मंडळ बेलबाग शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामराव फुगट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले याप्रसंगी निवृत्त शिक्षक मनोहर देसले सर यांनीही मनोगत व्यक्त करुन स्पेलिंग बी या स्पर्धेत तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेमधील विजयी विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपयांचे बक्षीस दिले तसेच निरोपार्थी कोंडावार सर यांनी गावाप्रती व विद्यार्थ्यांप्रति भावना व्यक्त केल्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति मनोगत व्यक्त करून शिक्षकांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्यात शाळेच्या वतीने कोंडावार सर यांना भेटवस्तू देण्यात आली प्रसंगी शाळेचेही आपण काही देणे लागतो हा उद्देश ठेवून कोंडावार सर यांनी शाळेसाठी दोन नोटीस बोर्ड भेट दिली व स्पेलिंग बी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भेट दिले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, पालक मनोगत व्यक्त करत असताना अनेकांच्या भावना डोळ्यातल्या अश्रूंमधून व्यक्त होत होत्या. गावाने व शाळेने दिलेला हा निरोप कायमच प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात सदैव राहील.