मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानगाव नजिक येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव-
मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खानगाव नजिक शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना हासुरे इंग्रजी प्रायमर , मराठी सचित्र बालमित्र अंकलिपी ,मिक्स वही,पेन्सिल, खोडरबर, पट्टी इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेने २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले असून शाहिद जवान कुटुंब, समाजातील गरीब, दिव्यांग,गरजू व्यक्ती, दिपावली फराळ वाटप,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य यांना मदत करण्यात आली.आजपर्यंत संस्थेच्या वतीने १७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.सुनिल देवढे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नितीन गारे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) यांनी भूषविले .प्रा.अरुण देवढे सर यांनी शाळेतील विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाविषयी बहूमोल मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष केशवराव जाधव, उपाध्यक्ष योगेश न्याहरकर,सचिव प्रा.सुनिल देवढे सर,खजिनदार सूर्यकांत जाधव विश्वस्त प्रा.अरुण देवढे सर, तसेच,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजय बकुरे, माजी अध्यक्ष गणेश गारे , सदस्य मयूर निकम,बापू गारे, यशवंत वाघ, ज्ञानेश्वर गारे, बाळासाहेब गारे , सतिष गारे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी अनंत सोमवंशी (अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे(पुणे), कार्याध्यक्ष ऍड.सुनिल वाघचौरे,विश्वस्त समीर देवढे सर, डॉ.शशिकांत देवढे, सोपान जाधव, ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सभासद गोरख देवढे सर,प्रताप आढाव सर,सचिन शेलार सर, नवनाथ कोकणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद राठोड सर यांनी तर आभार शाळेच्या शिक्षिका आशा गवळी यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.