नाशिक मधील मन हे लावणारी घटना नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, तेराव्या दिवशी आई जग सोडून गेली, आणि पंधराव्या दिवशी वडील आणि भाऊ यांचा मृत्यू
नाशिक प्रतिनिधी

नाशिक – आजारपणामुळे नऊ वर्षे मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या तेरावी चा विधी होत असताना आईची तब्येत खालावली आणि तिचा पण मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूचा धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप लेकालाही काळाने गाठले. घरात बाप आणि लेखाचा मृत्यू आढळून आला आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या महिन्याभरात पाथर्डी फाटा परिसरात वासन नगरातील हसत खेळत महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं, सुखी कुटुंबाच्या या करून अंतामुळे अवघ शहर हळहळत आहे . तुषार महाजन आणि कुटुंब जळगाव जिल्ह्याच्या यावला तालुक्यातील हिंगोली येथील मूळ रहिवासी गेल्या दोन अडीच वर्षापासून नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील वासन नगर येथे वास्तव्यास होते ,तुषार महाजन यांना दोन मुलं, एक मुलगा कार्तिक तेरा वर्षाचा तर मुलगी हर्षदा,नउ वर्षाची हर्षदा ला काही दिवसापूर्वी ताप आला होता, हा ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 25 दिवसांपूर्वी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या लेकीच्या मृत्यूचा आई स्वातीला धक्का बसला होता .मुलीच्या मृत्यूनंतर तिचा तेरवीचा विधी होत असताना आईची तब्येत खराब झाली त्याच्या उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या ऊपचारादरम्यान मृत्यू झाला. पंधरा दिवसात पत्नी आणि नो वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने तुषार महाजन यांना मोठा धक्का बसला होता. आई आणि मुलीच्या निधनामुळे खचलेल्या तुषार आणि कार्तिक यांना धीर देण्यासाठी नातलगांणी बरेच प्रयत्न केले ,मुलाकडे बघून या दुखातून बाहेर पडा , अशा शब्दात आप्तधिर देत होते. मात्र झालेला आघात तुषार यांना सोसवला नाही. सोमवारी या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शर्माळे आणि त्याचे सहकारी दाखल झाले. दोघांचेही मृत्यु देह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तुषार आणि कार्तिक ने आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.