लोक निर्माण बहुउद्देशीय संस्थेचा एक अनोखा उपक्रम कर्णबधिर व मतिमंद मुलांसोबत सामान्य मुलांचा नृत्य अविष्कार
संपादक सोमनाथ मानकर

नवीन नाशिक- कर्णबधिर व मतिमंद मुले ही निसर्गाच्या देण्यावर कुडत न बसता त्यांचा स्वीकार करत त्यावर कल्पकतेने कशी मात करू शकतात हे या नृत्य कार्यक्रमाने सिद्ध करून दाखवले . राणे नगर राजू नगर रोड येथील किशोर नगर सभागृह मध्ये नुकताच नृत्य कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सेलिब्रिटी गेस्ट मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून माजी
सभापती मामासाहेब ठाकरे, उपनिरीक्षक वाहतूक शाखा नाशिक धनराज पाटील ,अभिनेते विशाल पाटील, डॉ.उल्हास कुटे, शिवसेना विभाग प्रमुख विनोद दळवी ,राष्ट्रवादी काँग्रेस नवीन नाशिक अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दिग्दर्शक भगवान देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सपकाळे , दिग्दर्शक विजय जाधव, माजी नगरसेविका छाया देवांग, चारुदत्त दीक्षित उपस्थित होते.
पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
अतिथी मनोगत
सेलिब्रेटी गेस्ट शिल्पी अवस्थी यांनी यावेळी सांगितले की
गेल्या दोन महिन्यापासून अध्यक्ष चंदन खरे हे माझ्या संपर्कात होते कठोर परिश्रम करून त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, कर्णबधिर व मतिमंद मुलांना शिक्षणाबरोबर कलागुणांना ही वाव देण्याची संधी लोक निर्माण बहुउद्देशीय संस्थेने उपलब्ध करून दिली आहे खरंच ही कौतुकाची बाब आहे,
नृत्यची सुरुवात देवा श्री गणेशा गाण्याने करण्यात आली, यावेळी
कर्णबधिर मुल वैष्णवी वाबळे, राहूल,आकाश, जाँयल, यांनी ललाटी भंडार या गाण्यावर नृत्य सादर करत असताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा उत्साह वाढवला
मतिमंद विद्यार्थिनी समीक्षा रावळे ने लावणी रिमिक्स वर नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली, हृदयाला स्पर्श करणारे गाणे दमलेल्या बाबाची कहाणी वर श्रद्धा बोराडे चे नृत्य बघून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आनावर झाले, शिव तांडव स्तोत्रम नृत्याने वातावरण भक्तीमय केले, विविध एकापेक्षा एक उत्कृष्ट नृत्य बघून प्रेषक भारून गेले, जवळजवळ 50 ते 55 विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्यासाठी सहभाग नोंदवाला होता. यात( सोलोडान्स) एकल नृत्य
,( डुएट डान्स)युगल नृत्य,
(ग्रुप डान्स) समुह नृत्य
असे तीन नृत्य प्रकारात पहिले दुसरे तिसरे बक्षीस ठेवण्यात आले होते.
बक्षिस वितरणाप्रसंगी लाभलेले
प्रमुख पाहुणे,मिसेस इडिया इटर नँशनल शिल्पी अवस्थी,
निवासी संपादक हेमंत भोसले,
नागरिक संघर्ष समिती गणेश पवार, रवि भालेराव,
अभिनेता अजित गोडसे, अभिनेत्री अर्चना नाटकर, चारुदत्त दक्षित अदी उपस्थित होते.
सोलो डान्स एकल नृत्य पहिले बक्षिस- तनिष्का बर्वे ला शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते मिळाले
दुसरे बक्षीस- अदिती कोंदे हिला रवी भालेराव यांच्या हस्ते मिळाले
तिसरे बक्षीस – श्रद्धा बोराडे ला अर्चना नाटकर यांच्या हस्ते मिळाले,
डुएट डान्स(युगल नृत्य)
पहिले बक्षीस कनक वआराध्य यांना हेमंत भोसले निवासी संपादक आपल्या महानगर यांच्या हस्ते मिळाले,
दुसरे बक्षीस श्रद्धा व नेहा यांना अभिनेते अजित गोडसे यांच्या हस्ते देण्यात आले
तिसरे बक्षीस डी डी ए यांना पत्रकार सुधीर उमराळकर यांच्या हस्ते,
(ग्रुप डान्स) समूह नृत्य बक्षीस
पहिली बक्षीस शिव पूजा डान्स ॲकॅडमी यांना गणेश पवार नागरी संघर्ष समिती अध्यक्ष यांच्या हस्ते
दुसरे बक्षीस डीजे डान्स ग्रुप यांना कैलास पाटील यांच्या हस्ते
तिसरे बक्षीस डान्स इलाईट ग्रुप ला चारुदत्त दीक्षित यांच्या हस्ते
उत्तेजनार्थ बक्षीस
समीक्षा राऊळे (मतिमंद )
वैष्णवी वाबळे( कर्णबधिर)
गायत्री देवरे ,स्पंदन खरे, राधा ठाकूर ,नेहा खंदारे ,गार्गी अहिरे, उन्नती इस्ते, प्राजक्ता शिरसाठ, पायल जाधव ,रश्मी कामंत, काव्या जगडे ,प्रेक्षा गांगुर्डे, अक्षदा राजपूत, गोल्डन ग्रुप, कर्णबधिर ग्रुप, डिडिए ग्रुप अदीना देण्यात आले,
कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक नंदन खरे, अध्यक्ष चंदन खरे उपाध्यक्ष अनिता खरे,सचिव कुंदन खरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन साळवे, रोशनी साळवे, प्रतिमा गोस्वामी सचिन साळवे, जाकीर पठाण यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
जानवी बिरारी, वैशाली दराडे, रिटा सोनी, माधवी मोरणकर,बाळासाहेब सूर्यवंशी,
मंगेश वाबळे आदींनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना शेवाळे यांनी केले
परीक्षक म्हणून जेम्स यांनी काम बघितले
आभार प्रदर्शन अध्यक्ष चंदन खरे यांनी केले