वनी व कळवण पोलिसांची कामगिरी दहा वर्षानंतर मुलगी दिली आई वडिलांच्या ताब्यात .पोलिसांचे होत आहे कौतुक
सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड
दि. ०३/०३/२०२४ रोजी पुणे जिल्हयातील वाघाळी, ता. शिरूर येथील फिर्यादी लक्ष्मण मारूती तांबे यांची मालकीची चारचाकी सेलेरिओ कार व ५० हजार रूपये रोख कोणीतरी संशयीत इसम घेवुन पळुन गेला आहे, याप्रकरणी शिकापुर पोलीस स्टेशन, जि. पुणे येथ गुन्हा नोंद क २३९/२०२४ भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणातील संशयीत इसम हा एका मुलीसह सप्तश्रृंगी गडावर दिसुन आल्याची बातमी वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील यांना मिळाली होती. त्याप्रमाणे दि. ०४/०३/२०२४ रोजी वणी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार सदर संशयीत इसमाचे शोधार्थ नांदुरी व सप्तश्रृंगी गड परिसरात खाना झाले. सप्तश्रृंगी गडावर चंडीकापुर शिवारातील जंगल परिसरात एक संशयीत इसम व मुलगी दिसुन आल्याने वणी पोलीसांनी लागलीच सदर ठिकाणी धाव घेवून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्यांनी वरील प्रकरणातील सेलेरिओ कार चोरी केल्याची कबुली दिली व सदर इसमासोबत असलेली मुलगी कोण याबाबत विचारणा केली असता त्याने ही त्यांचीच मुलगी असल्याचे सांगीतले. सदर मुलीने देखील अशीच हकिकत सांगितली. परंतु त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता पोलीसांना त्यांचे सांगण्यामध्ये तारतम्य नसल्याचे लक्षात आल्याने पोलीसांनी दोघांकडे सखोल पदधतीने चौकशी केली असता सदर मुलीने तिचे नाव रूपाली, वय १६ वर्षे असे सांगितले, व ती लहान असल्यापासून यातील संशयीत इसमासोबतच राहत असुन ते तिचे वडील असल्याचे सांगितले.
परंतु यातील ताब्यात घेतलेला संशयीत इसम अनिल अंबादास वैरागर, रा. कौटा, ता. नेवासा, जि. अहमदनगर याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याचेसोबत असलेली मुलगी रूपाली हीस साधारण १० वर्षांपूर्वी, ती ०६ वर्षाची असतांना तिला त्याने साकी, जि.धुळे येथुन पळवुन आणले असल्याची धक्कादायक माहीती समोर आली. वणी पोलीसांनी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली, त्यावर ताबडतोब पुढील तपास करीत साकी पोलीस ठाणे, तसेच संबधीत गावातील पोलीस पाटील, सरंपच यांचे मदतीने मुलीची आईस शोधुन काढले व मुलीचे आईसोबत बोलणे देखील करुन दिले. त्यानंतर मुलीची आई व नातेवाईक हे वणी पोलीस ठाणेस आल्याने सदर मुलगी रूपाली हिस सुखरुप तिचे आई व मामा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. यातील संशयीत इसम नामे अनिल अंबादास वैरागर, याचेवर शिकापुर पोलीस ठाणे येथे भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास शिकापुर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे वणी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे, पोना वसंत साबळे, पोकॉ सुनिल ठाकरे, दिपक गवळी, महिला पोलीस अंमलदार तारा बागुल यांचे पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन, पाच वर्षाची असतांना हरवलेल्या रुपालीस १० वर्षानंतर तिचे मुळ नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप टिले आहे.