
लासलगाव…
शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी, वर्षातून एकच दिवस योगदिन साजरा न करता 365 दिवस योगा करावा तसेच निरोगी शरीरासाठी योगा खूप महत्वाचा आहे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप चांगले मानले जाते.योग हा माणसांना जोडण्याचे काम करत असून तुम्हाला वर्तमानात जगण्याचे शिकवते असे भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सुवर्णा जगताप यांनी या वेळी सांगितले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तसेच मोदी @9 महा जन संपर्क अभियान अंतर्गत नाशिक ग्रामीण मधील लासलगाव मंडलामध्ये भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल आयोजित, लासलगाव डॉक्टर्स असोसीएशन, लासलगाव केमिस्ट् असोसिएशन व अंबिका योग कुटीर, ठाणे, शाखा लासलगाव यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक २१ जुन २०२३ रोजी सकाळी ६.१५ वा. बालाजी मंदिर हॉल, कोटमगाव रोड येथे योग दिन कार्याक्रम घेण्यात आला. सुंदर ओघवत्या शैलीत योग मार्गदर्शन श्री. तुषार देवरे यांनी दिले.डॉ सुरसे यांनी सुरवातीला योगाची माहिती सांगितली.डॉ कांगने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुवर्णा जगताप,API राहुलजी वाघ व त्यांचे सहकारी,जेष्ठ सदस्य किशोरजी होळकर, जेष्ठ नेते राजाभाऊ चाफेकर,डॉ.असोसिएशन अध्यक्षा संगीता संगीता सुरसे, भाजयुमो शहर अध्यक्ष निलेश जगताप,जैन प्रकोष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मनीष चोपडा,डाँ जाधव, डाँ विलास कांगणे,इतर पदाधिकारी, ग्रामस्थ असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.