आज दि.२१ जून २०२३ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव.ता.चांदवड. जि.नाशिक. येथील विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
ज्ञानेश्वर पोटे

आजच्या योग दिना साठी व योग प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी कु.नंदिनी बळीराम आंबेकर. इ.७ वी. (रावळगाव पब्लिक स्कुल,ता.मालेगाव.) येथील बाल कलाकारास शाळेतर्फे आमंत्रित करण्यात आले. सदर कु.नंदिनी आंबेकर या विद्यार्थिनीने विद्यालयाच्या प्रांगणात सर्व मुलांना योगा चे विविध सुंदर प्रात्याक्षिक करून दाखविले. विद्यार्थी,शिक्षक,व गावकऱ्यांनी या योगा प्रत्यक्षिकास उस्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेचे पर्वेक्षक व श्री.अनिल ढोकणे सर,तसेच क्रीडा शिक्षक श्री.भाऊसाहेब शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री.विजय सानप सर,मा.पर्यवेक्षक श्री.ढोकणे सर, शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत पाटील.सर्व सदस्य यांचे तर्फे कु.नंदिनी आंबेकर हिचा शाल ,श्रीफळ,योगा मॅट ,शाळेचे बोधचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
तसेच जिल्हा परिषद शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे आज जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांनी योग्य ती विविध प्रकारचे योगासने करत शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य पालक वर्ग शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांसह इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते