एका महीलेचा आजार बरा करण्यासाठी तीचेवर जादु टोणा करुन तीचे फोटो काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तीचे पतीला मारुन टाकण्याची धमकी देऊन बलात्कार
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव शहरातील एका पिडीत महीलेने दि १४/०६/२०२३ रोजी लासलगाव पोलीस स्टेशन ला हजर होऊन फिर्याद दिली की १३ वर्षा पुर्वी तीचे लग्न झाले असुन लग्नापासून तीचे अंगात येत ( घुमत) असलेने तीला बरे करण्यासाठी तीचे सासर कडील लोक सासु सासरे नवरा यांनी चाळीसगांव येथील मुसा कादरी बाबाच्या दर्गेत टाकले होते. तेथे गुन न पडल्याने वेगवेगळ्या बाबांकडे, वाणी भक्तांकडे दाखवत तेथेही गुन न पडल्याने हल्ली काही दिवसांपूर्वी सदर पिडीत महिलेला कृष्णा संजय लोखंडे रा टाकळी विंचुर ता निफाड या भक्ताकडे दाखवण्यात आले असता त्याने सदर महीलेला उपचाराच्या बहाण्याने केद्राई माता मंदिर चांदवड येथे, नांदुर मध्यमेश्वर नदीचे संगमावर, अंतापुर ता-हाबाद येथील नदीत आंघोल घालण्याचे बहाण्याने बाहेर फीरवत,तीला पाण्यात लींबु, जडीबुटी व अगारा टाकुण ते पाणि तीला पाजुन तीचे आजु बाजूला बसुन तीचे सोबत फोटो काढून ते फोटो नव-याला दाखवल व व्हायरल करुन तुझी बदनामी करण्याची धमकी देत व तीचे नव-याला देखील जादु टोणा -भानामती करुन मारुन टाकण्याची धमकी देत तीला ब्लॅकमेल करून दि ३०/०५/२०२३ रोजी दुपारी तीला फोन करुन दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने दवाखान्या समोर बोलावून घेवून तेथुन त्याचे मोटार सायकल वर बसणेस भाग पाडून देवनदी पात्रा लगत असलेल्या लासलगाव ते समीट डाऊन रोड बाजु कडील रेल्वे रुळाचे बाजूला असलेल्या घनदाट झाडी झुडपात निर्मनुष्य ठिकाणी घेवुन जावून तीचेवर संभोग केला अशी फिर्याद दिली असता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक मा श्री शहाजी उमाप साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे मॅडम यांना सदर माहिती अवगत करुन त्यांचे आदेशानुसार दि १४/०६/२०२३ रोजीचे पोलीस ठाणे अंमलदार पोलीस उप निरीक्षक श्री मारुती सुरासे व महिला पोलीस नायक सौ उषा आहेर यांनी लासलगाव पोलीस स्टेशन चे अभिलेखावर तात्काळ गुन्हा रजीस्टर नबर १४४/२०२३ भारतीय दंड विधान संहिता १८६० चे कलम ३७६,५०६ प्रमाणे व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोर प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्या बाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्या बाबत चा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटणेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी ताबतोप उप विभागीय पोलिस अधिकारी निफाड व लासलगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ साहेब यांनी तातडीने भेट दिली असुन वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर गुन्हयाचा पुढील अधीक सखोल तपास लासलगाव पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक श्री देविदास विश्वनाथ लाड साहेब यांना आदेश देण्यात आले असता त्यांनी फिर्याद,पंच, साक्षीदारांसह घटनास्थळी जाऊन आरोपीचे घरातुन जादु टोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पंचरंगी धागा, लींब, तावीज, मोर पिसारा कुच्चा, बीर कंगण कड, मुस्लिम पध्दतीचे लाल रंगाचा मोठा खडा असलेले सफेद रंगाचे कडे व मुस्लिम पध्दतीच्या माळा, छडी, लोखंडी चीमटा, गुडी लावण्याचे विवीध आकाराचे लहान मोठे दगड, रींगा, अंगारा, मुस्लिम कबर असलेले फोटो, आरोपीताने फिर्यादी पिडीत महिलेला ज्या मोटार सायकल वर बसवून नेले होते ती मोटार सायकल असे सर्व साहित्य गुन्हयाचे तपास कामी सरकारी पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे. आरोपी गुन्हा केल्या पासुन फरार झाला असता पोलिसांनी आरोपीचा शोध त्यास आज अटक करुन कोर्टात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे अशी खात्रीशीर माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.