भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश आयोजित महिलांकरिता सहकारी संस्थेचे प्रशिक्षण शिबिर दादर येथे यशस्वीरित्या संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश आयोजित महिलांकरिता सहकारी संस्थेचे प्रशिक्षण शिबिर दादर येथे यशस्वीरित्या संपन्न
नाशिक जिल्ह्यातून भाजपा महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षा सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 84 महिला मुख्य प्रवर्तकांचे प्रस्ताव सादर
महिलांना राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रांमध्ये सक्षम करण्याचा भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ठ आहे .महिलांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात यावं असं वाटत असेल तर आधी महिलांचे सक्षमीकरण करायला हवे त्यासाठी महिलांचे योगदान सहकार क्षेत्रात असणे गरजेचे आहे सहकार क्षेत्रात ही महिलांना मतदानाचा अधिकार असायला हवा सहकार क्षेत्रात ही महिला उच्च पदावर पोहोचू शकतात या दृष्टीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय सौ चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात महिला सेवा सहकारी संस्था स्थापन करून या संस्थांना सरकारी निम सरकारी कंत्राट कशा पद्धतीने मिळवायचे याची सविस्तर माहिती महिलांना मिळावी यासाठी सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी योगी सभागृह मुंबई दादर पूर्व येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले .महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री अतुलजी सावे महिला व बाल विकास मंत्री माननीय नामदार श्री मंगल प्रभास जी लोढा मुंबई प्रदेश भाजपाध्यक्ष माननीय आमदार ऍडव्होकेट आशिष जी शेलार विधान परिषद गटनेते माननीय आमदार श्री प्रवीण जी दरेकर इत्यादी मान्यवरांनी आपल्या आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने महिला हजर होत्या. नाशिक जिल्ह्यातून भाजपा महिला मोर्चा नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षा सौ सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 84 महिला मुख्य प्रवर्तकांनी हजेरी लावली,यावेळी त्यांनी आपापल्या नियोजित संस्थेचे सर्व अध्यक्ष सभासद यांचे नावे व कागदपत्र सादर केले.
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय सौ चित्राताई वाघ यांनी आलेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन केले .भाजपा प्रदेशचे अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आलेल्या सर्व महिलांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.