जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे शाळेतील बाल वारकऱ्यांकडून आषाढी वारी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे शाळेतील शिक्षकांनी आषाढी वारी निमित्ताने लहान मुलांना वारकरी पोशाख घालून दिंडी उत्सावाचे छान आयोजन केले. लहान मुलांना शाळेतून वारकरी संप्रदायाची माहिती मिळावी,आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेतर्फे छान प्रकारे योग्य नियोजन करून लहान मुलांना वारकरी संप्रदायाबद्दल माहिती सांगण्यात आली. आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे.वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे.आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत येतात, यालाच आषाढी वारी असे म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतात आषाढी वारीसाठी श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत गजानन महाराज,संत मुक्ताबाई आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी पंढरपूर येथे पांडूरंगाच्या दर्शनासाठी येतात. दर आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील वारकरी वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास/व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असा विश्वास विठ्ठल भक्तांना असतो,म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व असते. या दिवशी गावोगावी विठ्ठलाची मंदिरे, गावातील शाळेतील लहान मुलांना वारकरी पोशाख घालून आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात करून माऊली माऊली या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमून जातो. दरवर्षीप्रमाणे आषाढी वारी निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन केले होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर, श्री.पवार सर,श्री.गवळी सर,सौ.बच्छाव मॅडम,सौ.गायकवाड मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समितीने योग्य आयोजन केले होते.