
कळवण- डांग सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय ओतुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
26 वर्षानंतरच्या भेटीने गुरुवर्य व शालेय मित्रांचा आनंदोत्सव
ओतुर- येथील डांग सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय ओतुर विद्यालयातील सन1996/97 या वर्षाच्या इयत्ता दहावीत असलेल्या मित्र मैत्रिणींचे तब्बल 26 वर्षानंतर स्नेह संमेलन झाले.
प्रथमतः सर्व गुरुवर्य यांचेवर सर्व विद्यार्थ्यांकडून पुष्पवृष्टी केली. औक्षण व गुलाबपुष्प देऊन सौ.रुपाली कासार यांनी व्यासपीठावर स्थानापन्न केले. मा. मुख्याध्यापिका श्रीमती. के.आर. भोई यांना अध्यक्षीय स्थान तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यू एन रूपवते सर हे प्रमुख अतिथी होते. दिपप्रज्वलन करून भारतमाता, सरस्वती माता व कै. बिडकर दादा यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.26 वर्षात मृत्यु पावलेले गुरुवर्य व मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गुरुजनांचा कृतज्ञता पत्र, भेटवस्तु व शाल देवुन आदरसत्कार करण्यात आला. सत्कारार्थी गुरुवर्य श्रीमती.व्ही.एस. पाटसकर, श्रीमती. एस. जी. थोरात, श्रीमती. पी. बी. पंडित, आर.डी. साळूंखे, डि.एस. पवार, एस. एस. पवार, डि. बी. कोठावदे,ए. आर. वाघ, एस. आर. वाघ, एस. बी. बच्छाव, बी. व्ही. जाधव, एन. जी. खैरनार, बी. पी. पंडित, एन. जी. बधान, ए. व्ही. शेवाळे, एस. जी. महाजन, एम.व्ही. देवरे.आपल्या गुरुजनांनी दिलेले उत्तम शिक्षण ,आई वडिलांचे संस्कार, गुरुजनांविषयी असलेला आदर सर्व जमलेल्या मित्र मैत्रिणीनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला. गुरुवर्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात सुद्धा जीवनसाराचे शिक्षणाचे धडे देत पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. दुपार सत्रात उत्कृष्ट असे पुरणपोळी आमरसाचे भोजन केले.सुत्रसंचालन कैलास पाटोळे यांनी केले. प्रास्तविक लाला देवरे यांनी केले. अध्यक्षीय भाषण झाल्यावर सौ. रुपाली कासार यांनी आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. हा स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी सर्वांना एकत्र आणणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे साठी पंकज मेणे, प्रविण आहिरे, स्मिता पवार यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी मंगेश दशपुते, उमेश चौधरी, संतोष मोरे, श्रीरंग दिक्षीत, मधुकर देवरे, भगवान आहेर, दत्ता काळे, योगेश पगार, योगेश राजपुत, शांताराम घोलप, संजय खांडवी, भिवराज काळे, सुभाष देवरे, भिवराज गायकवाड, रविंद्र वाघ, नंदु देवरे, रोहिणी बागड, सुवर्णा बाविस्कर, सुनिता जोपळे, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे, सरीता तिवारी, कल्पना जाधव उपस्थित होते.