जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथील कर्तव्यदक्ष उपशिक्षक माननीय श्री.पवार सर यांना यंदाचा कै.देवाजी नाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार सन 2024 जाहीर

भाटगांव – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चांदवड मार्फत दरवर्षी दिला जाणारा मानाचा, प्रतिष्ठेचा कै. देवाजी नाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार सन 2024 उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांना जाहीर झाले आहेत.
त्यापैकी भाटगांव तालुका चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे लाडके,मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष, उपशिक्षक माननीय श्री. धीरजजी राजाराम पवार सर यांना दिनांक १४ सप्टेंबर २०२४ (शनिवार) रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या सभागृहात शिक्षक नेते माननीय.श्री काळूजी बोरसे पाटील सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री.माननीय पवार सर यांना शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला त्या बद्दल पोलीस टाईम्स न्यूज चॅनल २४×७ चे मुख्य संपादक श्री.राहुल (केदू) वैराळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली, चांदवड तालुका ब्यूरो चीफ श्री. ज्ञानेश्वर पोटे यांच्यावतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन सरांचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र पोटे, श्री. गवळी सर,सौ.गायकवाड मॅडम,सौ. बच्छाव मॅडम आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.