रस्त्यावरील गोर-गरिबांच्या दुकानांवर कारवाई केल्यास,वंचित बहुजन आघाडी तर्फे, आंदोलन…..
मनमाड प्रतिनिधी -संतोष सातदिवे

मनमाड :-मनमाड नगर परिषद तर्फे दि 17/05/2023 रोजी रस्त्यावर दुकानें, हातगाडी, गोर-गरिबांना अतिक्रमण निष्कासित बाबतची नोटीसे देण्यात आलेली आहे, सदर नोटीसात, अतिक्रमण 03 दिवसात काढुन घ्यावे असे कळविले आहे,
परंतु रस्त्यावर असे छोटे मोठे, व्यवसाय करून आपले व आपल्या परिवाचे उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई का,?
मनमाड शहरात मोठे मोठे इमारती ज्यांनी बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे बांधकाम केले आहे, असे पक्के बांधकाम अतिक्रमण नाही का.? मनमाड नगर परिषद त्यांच्यावर पक्के अतिक्रमण निष्कासित कारवाई करणार का,?
मनमाड शहरातील पाणी टंचाई मुळे परस्थिती अशी की दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्या ही दुष्काळात तेरावा महिना म्हणावे की मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवरच अतिक्रमण कारवाई नोटीसे देण्यात आलेली आहे,
मनमाड नगर परिषद तर्फे गोरगरिबांवर अतिक्रमण कारवाई केली गेली तर त्यांचे उदरनिर्वाह उध्वस्त होऊन त्यांचे परिवारातील लोकांचे संपूर्ण आयुष उध्वस्त होणारे आहे, या हुकूमशाही पद्धतीची कारवाई मुळे गोरगरिबांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही, तरी रस्त्यावरच्या कोणत्याही दुकानावर अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये अन्यथा आमच्या संघटने तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी मनमाड नगर परिषदेची राहील, असा ईशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी तर्फे देण्यात आला, निवेदनावर, जिल्हा सचिव कादीर शेख, शहर उपाध्यक्ष गणेश एळींजे, शकील शेख, राकेश पगारे, जफर सैय्यद,पंकज आंबोळे, अमोल केरे, शकील शेख, पापा पठाण, दुकानदार बांधव, रफिक अत्तार, समीर अत्तार गणेश कासार, बादशाह अत्तार, सलीम अत्तार, भगित्रीबाई कासार, इम्तियाज अत्तार, अमजद अत्तार, जगदीश हादगे, अकील अत्तार, शमुना अत्तार, विलास देवरे, अल्ताफ अत्तार, शबाना अत्तार, ललित पाटणी, आदींचे निवेदनावर स्वाक्षरी आहे,