
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वेळापूर येथे मोठ्या उत्सवात साजरी
करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे मालेगावचे समाजसेवक युवा उद्योजक स्वप्निलभाऊ आहिरे यांच्या हस्ते बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीने आचरणात आणण्याची जबाबदारी घ्यावी, शिका,संघटित व्हा,संघर्ष करा या बाबासाहेबांनी सांगितलेलं मार्गाचे अनुसरण करा असे विचार मांडले. लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. वाघ साहेब यांनी बाबासाहेबांना वंदन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. जयंती समितीच्या वतीने श्री.वाघ साहेब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित दलित आदिवासी क्रांती दलाचे अध्यक्ष विनोद भोसले तसेच ग्रामसेवक श्रीमती.रेखा वाबळे सरपंच श्री.नारायण पालवे ग्रामपंचायत सदस्य दुर्गेश गरुड श्री.आबा पालवे श्री.शंकर कुटे श्री.केदु शिंदे श्री.निलेश पालवे श्री.संतोष कुटे रोहन गरुड जगदीश बदामे विकी आहिरे राहुल नेटारे भाईजान सागर गरुड नाना बदामे अनिल गरुड हर्षल पगारे दीपक गरुड योगेश जाधव विश्वनाथ पारखे सोनू पारखे जगदीश गरुडश्री. गणेश ठाकरे श्री.नारायण शिंदे श्री.शेलार सर पंडित गरुड आकाश ढाले अक्षय गरुड अनिल गरुड देविदास गरुड यश पारखे रूपेश पारखे श्री.ज्ञानेश्वर गरुड श्री.संतोष गरुड किरण गरुड गौतम गरुड आदी ग्रामस्थ उपस्थित होते, जयंतीचे अध्यक्ष नितीन गरुड यांनी उपस्थितांनचे आभार मानले.सूत्रसंचालन श्री.राठोड सर यांनी केले.