श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील पोलीस नाईक वर्षा निकम यांनी केली सोन्याची चैन भाविकांना परत
संपादक सोमनाथ मानकर

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून चोरांची वर्दळ वाढलेली आहे त्यामुळे भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेले आहे कारण या ठिकाणी पोलीस हे कमी असल्यामुळे नेमकी पोलिसांनी नांदूरी या ठिकाणी थांबावे की गडावरती असा संभ्रम पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना निर्माण झालेला आहे कारण पोलीस हे सप्तशृंगी गडासाठी कमी प्रमाणात आहे परंतु या ठिकाणी लाखो भाविक रोज येत असतात त्यामुळे पोलीस कमी असल्यामुळे चोरांचे फावत आहे परंतु दोन दिवसांत भाविकांचे सोनं व पैसे चोरी झालेले लक्षात येतात प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित करताच कळवण पोलिसांना जाग आली व त्यांनी जागोजागी पोलिसांना तैनात केल्यानंतर आज एक मोठी चोरी पकडण्यात यश आले कारण चोराने भाविकांची सोन्याची चैन चोरी केली परंतु पोलिसांना बघताच चोर ती वस्तू त्या ठिकाणी टाकून पळाला त्यामुळे तो पोलिसांच्या हाती नाही लागला
सप्तशृंगी गडावर मंगळवार दि ९ मे २०२३ रोजी आई सप्तशृंगी दर्शनाला येणारे भाविक भक्तांची श्री सप्तशृंगी गडावर गर्दी पहावयास मिळाली त्याच बरोबर सप्तशृंगी गडावरील असलेले रोपवे ट्रॉली परिसरात नंदिनी राहुल शिंदे ,ही तरुण कुटूंबासोबत सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आली असता गळ्यात असलेली सोन्याची चैन गहाळ झाली समजल्याने भाविकांमध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता परंतु सप्तशृंगी गडावर रोपवे परिसरात कर्तव्यावर असलेले कळवण पोलीस नाईक १३८८ वर्षा निकम यांचा कडे तक्रार केली महिला पोलीस कर्मचारी वर्षा निकम यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करून गहाळ झालेली 60,000 हजार रुपयांची सोन्याची चैन दर्शनासाठी आलेली भाविक भक्तांची सुपूर्द केली असता भाविक भक्ताने महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.