मनमाड नगरपरिषद चे लाचखोर कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंध विभागाची ची कारवाई, भ्रष्ट कर्मचाऱ्यांना 36,000 ची लाच घेतांना रांगेहात अटक,

मनमाड :-सविस्तर माहिती अशी की तक्रारदार हे मनमाड नगरपरिषद येथे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात यातील आरोपी 1) आनंद प्रभाकर औटी , वय-46 वर्ष, वरिष्ठ लिपिक, लेखा विभाग, नगरपरिषद, मनमाड. 2) संजय बबन आरोटे वय.- 52 वर्ष.व्यवसाय -रोखपाल , लेखा विभाग, नगर परिषद मनमाड, 3) नंदू पंडीत म्हस्के वय.- 58 वर्ष. व्यवसाय- शिपाई. लेखा विभाग नगर परिषद मनमाड यांनी टक्केवारीनुसार 36,000/- रुपये लाचेची मागणी केली होती, या भ्रष्टाचारी यंत्रनेला कंटाळून त्रस्त तक्रारदार तर्फे लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांना दि 02 /03/2023 रोजी तक्रार करण्यात आली,
दि 03/03/2023 रोजी लाच लुचपट प्रतिबंध विभाग नाशिक यांच्या तर्फे मनमाड नगरपरिषद येथे सापळा रचुन कारवाई करण्यात आली,
सदर कारवाईत मनमाड नगरपरिषद लाच खोर कर्मचारी 1) आनंद प्रभाकर औटी , 2) संजय बबन आरोटे नंदू पंडीत म्हस्के तर्फे 36,000 रु लाच स्विकारतांना अटक करण्यात आली कारवाईत 36,000 हजार मुद्दे माल देखील हस्तगत करण्यात आले आहे, पुढील कारवाई चौकशी शासकीय विश्राम गृह मनमाड येथे झाली व मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले,
ACB तर्फे सापळा रचून मनमाड नगर परिषद लाच खोर अधिकारी यांचेवर कारवाई करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी, मा,अनिल बागुल, पोलीस निरीक्षक , अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.सापळा पथक पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरूड,चा. पो ना. परशुराम जाधव.सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक उपस्तित होते सदर कारवाई ही मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.श्री.एन. एस.न्याहळदे, साो. व अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मार्गदर्शनाखाली करण्यात आली,
कारवाई नंतर लाच लुचपत प्रतिबंध विभागात तर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले ,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा,