लासलगाव महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

लासलगाव:अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लासलगाव महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, डॉ.दत्तात्रय घोटेकर, प्रा.गुरूदेव गांगुर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे, सर्व शिक्षक व स्वयंसेवक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत घेण्यात आले. याप्रसंगी किरण अंकुळणेकर, पुनम सोनवणे, वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उज्वल शेलार, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.दत्तात्रय घोटेकर, प्रा.किशोर गोसावी यांनी देखील शिवजयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना+२स्तर कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.गुरूदेव गांगुर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, सुनिल गायकर,देवेंद्र भांडे, सर्व शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.