ताज्या घडामोडी
बस मधील डिझेल चोरी करणाऱ्यास सापळा रचून अटक

सिन्नर – बेलू येथे कार मध्ये येऊन एसटी महामंडळाच्या मुक्कामी बस मधून डिझेल चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. मुक्कामी असलेल्या बसमधून 120 लिटर डिझेलची चोरी झाली होती , गुप्त माहितीनुसार बस मधून डिझेलची चोरी हा राहता तालुक्यातील अविनाश कुंदे यांनी केली असल्याचे पोलिसांना कळाले , कुंदे हा शिर्डी सिन्नर महामार्गाने त्याच्या स्विफ्ट कारणे नाशिक कडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने शहराजवळील गुरेवाडी फाटा येथे साध्या वेषात सापळा रचून त्यास अटक केली आहे.