ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव बेच्याळीसगाव परिसरातील ९ कोटी २० लक्षच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण क्रॉप कव्हर योजनेसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनात आवाज उठविणार – छगन भुजबळ येवला मतदारसंघात विकासाची कामे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू – छगन भुजबळ

मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव:- राज्यातील द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार सोबत खा.शरदचंद्र पवार साहेब चर्चा करत आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण राज्यात क्रॉप कव्हर योजनेच्या अंमलबजावणीसोबत द्राक्ष, कांदा निर्यात व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील लासलगाव बेच्याळीसगाव परिसरातील वनसगाव, सारोळे, खडक माळेगाव, निमगाव वाकडा, गोंदेगाव या गावांमध्ये आज विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर,मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, संत श्री.शिवगिरी महाराज, हभप निवृत्ती महाराज रायते, राष्ट्रवादी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,ज्ञानेश्वर शेवाळे, हरिश्चंद्र भवर, सुवर्णा जगताप, सरपंच दत्तात्रय डुकरे, लासलगावच्या माजी सरपंच कुसुमताई होळकर, गुणवंत होळकर, जगदीश होळकर, मुकुंद होळकर,आत्माराम दरेकर, वेदिका होळकर, शिवा सुरासे, शिवाजीराव ढेपले, उन्मेष डूमरे, प्रकाश दायमा, ॲड.अनुप वनसे, मंगेश गवळी, पूजा दरेकर, अलका गायकर, ललित दरेकर, विनोद जोशी,पांडुरंग राऊत, माधव जगताप, रवींद्र गायकर, भाऊसाहेब बोचरे, शिवाजी सुपनर, डॉ.विकास चांदर, बबन शिंदे, कैलास भोसले, केदुजी गवांडे, अनिल रनशुर, म्हसू भोसले, दिनकर भोसले, सुरेखा नागरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, एकीकडे शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेत असतो. त्याच्या पिकाला भाव मिळायला सुरुवात झाली की लगेचच निर्यात बंदी केली जाते. निर्यात शुल्क वाढविले जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ते धोरण आणले पाहिजे. अन्यथा शेजारील देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थिती प्रमाणे देशात परिस्थिती निर्माण होईल असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना किसान योजनेअंर्गत मदत सुरू केली होती. ही मदत आता पुन्हा काही शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. जो शेतकरी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तो शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहत आहे. यापूर्वी देशाच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी शरदचंद्र पवार साहेब यांनी यशस्वीरित्या सांभाळली. या देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जान असलेले ते एकमेव नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात शेतकऱ्यांच्या हिताचा नाही तर उद्योग पतींच्या हिताचा विचार करण्यात येत आहे. विशेषतः यामुळे शासकीय संस्था मोडकळीस येत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केली जात मात्र उद्योजकांना खैरात वाटली जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता दुसऱ्याच विषयांवर चर्चा करून देशातील नागरिकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार आहे. त्यामुळे निधी येण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. तरीही आपला नियमित पाठपुरावा सुरू असून कोट्या रुपयांची कामे मंजूर केली जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील ४२ गाव परिसरात देखील नागरिकांच्या मागण्या प्राधन्याने मार्गी लावण्यात येऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या हस्ते या विकासकामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

वनसगांव येथे ‘२५१५’ योजनेंतर्गत झालेल्या वनसेबाबा मंदिर परिसर सुधारणा लोकार्पण,व्यायामशाळाचे लोकार्पण, सारोळे खु. ता. निफाड येथे लासलगांव पिंपळगांव रस्त्यावरील सारोळे खु.येथील विनता नदीवरील पुलाचे बांधकाम करणे कामाचे उद्घाटन, स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडपाचे लोकार्पण, निमगांव वाकडा येथे धुळगांव सातारे पिंपळगांव लेप जऊळके शिरसगांव लौकी शेळकेवाडी पाचोरा लासलगांव रस्ताा (प्रजिमा-६९) किमी २०/४०० ते २३/४०० ची सुधारणा करणे कामाचे उद्घाटन, रेणुकानगर येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत सामाजिक सभागृह तर गोंदेगांव येथे प्रजिमा-६९ ते पाचोरे मरळगोई वाहेगांव रस्ताृ (प्रजिमा-१२७) किमी २/०० ते ७/६०० ची सुधारणा करणे कामाचे भुमीपूजन करण्यात आले.

 

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.