ताज्या घडामोडी

चेअरमन असावा तर असा——-

प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

ओझरखडे वितरिका क्रमांक 26 चे रोकडेश्वर पाणी वाटप संस्था कोटमगाव चे चेअरमन सर्वसाधारण कुटुंबातील पुरुष श्री भाऊसाहेब केशव पवार तसेच लाभार्थी शेतकरी यांनी माननीय उपभियंता साहेब ओझरखेड डावा कालवा पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि.नाशिक मा . सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस कार्यालय शाखा अभियंता व माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना दि.20/1/2023 रोजी लेखी व ईमेल स्वरूपात निवेदन दिले जर ओझरखेड डावा कालवा वितरिका क्रमांक 26 डाव्या बाजूला पाणी न सोडल्यास आमरण उपोषण करू असे निवेदन दिले त्यासंदर्भात जर ओझरखेड डावा कालव्याला पाण्याच्या आवर्तन सुरू असून वितरिका क्रमांक 26 च्या पूर्व बाजूपर्यंत पाणी आलेले आहे मात्र खानगाव नजीक येथील येथील काही शेतकरी कुठल्याही प्रकारचे नुकसान नसताना वरील पदाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन पाणी बंद करतात ते शेतकरी आपल्या जमिनीचा मोबदला घेऊन सुद्धा इतर शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवतात अशा शेतकऱ्यांना शासनाने कारवाई करावी व माननीय भुजबळ साहेब यांनी यासंदर्भात पाठपुरावा केलेला आहे उर्वरित कामे पूर्ण व्हावीत यासाठी निधी उपलब्ध झाला आहे तरी वितरिका क्रमांक 26 चे काँक्रिटीकरण पूर्ण करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत व त्रास देणाऱ्या शेतकऱ्यांना कारवाई करावी व वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब केशव पवार व लाभार्थी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे याची संबंधितात अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पाणी सोडण्यात आले त्या प्रसंगी माननीय उपसरपंच श्री योगेश पवार यांचे वडील श्री बाळासाहेब पवार यांनी संस्थेचे चेअरमन यांचे कौतिक केले सर्वसाधारण कुटुंबातील चेअरमन जे पाणी सावरगाव पर्यंत परत गेले होते ते पाणी वंचित शेतकऱ्यांपर्यंत आणले तसेच या कार्यक्रमास लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी पूजन केले याप्रसंगी श्री बाळासाहेब सुपेकर ह .भ. प बाळासाहेब शिरसाठ श्री पांडुरंग सुपेकर श्री सुनील सुपेकर श्री दत्तात्रय सुपेकर श्री समाधान सुपेकर श्री संतोष पवार श्री किरण सुपेकर श्री शिवाजी पवार श्री सचिन पवार चि भैय्या पवार श्री शरद पवार श्री रोहिदास पवार श्री अनिल शिरसाठ श्री शंकर सुपेकर श्री अशोक सुपेकर श्री गंगाधर पवार श्री रोहिदास पवार श्री . बाजीराव कराटे तसेच सौ. आशाताई पवार सौ रंजन सुपेकर सौ मीराताई सुपेकर सौ.उषाताई सुपेकर आधी शेतकरी उपस्थित होते या कामाचे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी रोकडेश्वर पाणी वाटप संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब केशव पवार यांचे आभार मानले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.