तालुक्यातील वनसगाव येथे कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग…
ज्ञानेश्वर भवर

तालुक्यातील वनसगाव येथे कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग म्हणजेच पी एम एफ एम इ अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत श्री रवींद्र अमृतकर यांनी या योजनेविषयी उपस्थित महिला बचत गट व ग्रामस्थ यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच श्री सोमवंशी साहेब मंडळ कृषी अधिकारी लासलगाव यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य याविषयी मोलाची माहिती दिली सरपंच श्री महेश केदारे कृषिमित्र श्री सुभाष जाधव गृहउद्योजक श्री सुनील शिंदे यांनीही मोलाचे मागदर्शन केले . या योजनेमध्ये जास्तीजास्त महिला व ग्रामस्थानीं सहभाग घ्यावा व आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन श्रीमती चव्हाण मॅडम यांनी कृषि विभागामार्फत केले. सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्रीमती आहेर मॅडम, श्री कापरे साहेब, कृषी सहाय्यक अहिरे मॅडम, श्रीमती माळी मॅडम ,श्री शिंदे साहेब, गावातील प्रतिष्ठित शेतकरी श्री उन्मेष डुंबरे, सागर शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बचत गटाच्या सीआरपी श्रीमती निकम मॅडम व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे नियोजन वनसगावच्या कृषी सहाय्यक श्रीमती निता चव्हाण यांनी केले व आभार मानले.