कळवण तालुक्यात आंबेडकर विचार मंच्यावतीने नाचुन नाही, तर वाचून जयंती साजरी
वैभव गायकवाड

कळवण – शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवर व तालुक्यातील समाज बांधवांच्या हस्ते महामानवाच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. कळवण तालुका आंबेडकर विचार मंचच्या वतीने कळवण बस स्थानकाजवळ भव्य स्टेज देण्यात आला होता. महिन्याभरापूर्वी भिमजयंती कळवण शहरात मोठया उत्सवात साजरी करण्यासाठी आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून आंबेडकर विचार मंच आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येऊन तालुक्यातील समाजबांधवाना कळवण येथे जयंतीदिनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होतें . त्या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी कळवण शहरात उपस्थित राहिले होतें. यावेळी आंबेडकर विचार मंचच्या सर्व सदस्यांकडून महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून तसेंच पंचशील, त्रिसरण घेऊन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोच्या घोषणानी परिसर दणानून गेला होता.कळवण तालुक्यातील संपूर्ण समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित राहिल्याने सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आले.. त्याचप्रमाणे कळवण शहरातील भिम जयंती उत्सव समिती, साहेब प्रतिष्ठान, शिवाजी नगर मित्र मंडळ यांच्या वतीने कळवण शहरात महामानवाला अभिवादन करण्यात आले.