लासलगाव नगरित श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदीर चा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

आज दिनांक 3 2 2023 रोजी ब्राह्मण सेवा मंडळ लासलगाव यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच कलशारोहण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लासलगावातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतला व तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर बांधकाम करण्यासाठी व इतर स्वरूपात मोठे मोलाचे योगदान दिले.
त्याबद्दल ब्राह्मण सेवा महामंडळाच्या वतीने सर्व लासलगाव व निफाड तालुका परिसरातील नागरिकांचे जाहीर आभार मानण्यात आले.
अध्यक्ष मंडळ विजय दत्तात्रय जोशी, श्री वसंत दत्तात्रय दंडवते,दिलीप वसंत कुलकर्णी,आतिश दिगंबर कुलकर्णी,शेखर वसंतराव कुलकर्णी,अतुल दिनकर कुलकर्णी,चंद्रकांत प्रभाकर डांगे,तसेच माननीय सरपंच लासलगाव जयदत्तजी होळकर तसेच डी.के.नाना जगताप जिल्हा परिषद सदस्य तसेच सुवर्णा ताई जगताप माजी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव संजय होळकर, प्रकाश दायमा, न्यायभूमी न्यूज मुख्य संपादक अभय पाटील तसेच खासदार केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई पवार यांचे स्वीय सहाय्यक उन्मेश काळे यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला व ब्राह्मण समाजात सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
परिसरातील इतर सर्व मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ ब्राह्मण युवा संघटना अध्यक्ष मयूर नंदकिशोर भंडारी,संदीप सुधाकर दीक्षित, ऋषिकेश भास्कर जोशी, श्रीपाद चंद्रकांत खोत, दिनेश शामराव जोशी, गणेश विजय जोशी,ईश्वर दीपक केंगे, दीपक नरेंद्र कुलकर्णी, गणेश प्रमोद कुलकर्णी, हेमंत खानापूरकर, सुशील सुधाकर जोशी,गुरुप्रसाद किशोर जोशी तसेच परिसरातील ब्राह्मण समाजातील इतर सर्व नागरिकांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.