ताज्या घडामोडी
लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे खंडेराव महाराज यात्रे निमित्त बैलगाडा ओढण्याचा कार्यक्रम
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे सालावादाप्रमाणे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी भंडाऱ्याचे मुक्त उधळण करण्यात आली. येथे दरवर्षी खंडेराव महाराज यात्रा उत्सव आयोजित केला जातो यंदा बारा गाड्या ओढण्याचा मान श्री ललित भाऊ शिंदे यांना मिळाला . दि.18 ते 24 फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जागरण गोंधळाचा आनंद गावकऱ्यांनी लुटला.
यात्रा उत्सवात परिसरातील मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमात महाप्रसादाचे नियोजन होते मनमुरांतपणे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला