वसुनंदिनी फाऊंडेशन जामनेर राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण

अनाथाची व वृध्दांची आई समाज रत्न पुरस्काराचे रविवार दि 29/01/2023 रोजी जळगाव ब्रम्हण सभा बळीराम पेठ हाॅल येथे संपन्न झाला
लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्द आश्रमाची माता सौ संगिता माई दिलीप गुंजाळ याना राज्य स्तरीय थोरसमाज सेविका अनाथाची व वृध्दांची आई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व तसेच विसा स्केटीग अॅकडमिची स्केंटीग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिला समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मा विद्याधर सोनवणे वसुनंदिनी फौडेशनचे अध्यक्ष यानी प्रथम अनाथ आश्रमाची कामाची संखोल माहिती घेतली व त्यानी आश्रमिय व्यावस्थापिका अनाथाची व वृध्दांची आई सौ संगीता दिलीप गुंजाळ याची पुरस्कारासाठी निवड केली खर्या अर्थाने अनाथाच्या व वृध्दाच्या सेवेचे फळ वसुनंदिनी या संस्थेने पुरस्कार देऊन एक प्रकारे या कार्याचे कौतुक केले तसेच एकाच स्टेजवर मुलींला व आईला पुरस्कार देऊन या वसुनंदिनी फाऊंडेशनने दुर्गाचे व माईचे नवचैतन्य वाढवले आहे कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ याची निवड सौ माधुरी ताई कुलकर्णी संचिव वसुनंदिनी फाऊंडेशन तफॅ दुर्गास समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ति स्केंटीग खेळामध्ये राज्यभर जिकावी असा उपस्थितांनी आपल्या भाषणातुन गुणगौरव केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डाॅ सौ सुनिता मोडकं संस्थापक अध्यक्ष कल्याणी बहुउदेशीय संस्थां नाशिक ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे प्रिया प्रमोद दामले चिञपट निर्मिती प्रमुख पुणे विशाल नामदेव सिरसाट संस्थापक भारतीय साहित्य व संस्कृतीक मंच पुणे डाॅ विठ्ठल किसन आहेर प्रख्यात आरोग्य तज्ञ पुणे सौ नयना ओगले कला भ्रमंती संस्था नाशिक डाॅ अश्विनी अशोक डोलारे कोर्ट कमिशनर महानगरपालिका जळगाव श्रीमती प्रज्ञा अरूण कांबळे जेष्ठ समाज सेविका जळगाव सिनेअभिनेञी वर्षा देशमुख शितोळे लेखिका गायिका नाशिक श्री विद्याधर सोनवणे वसुनंदिनी फाऊंडेशन संस्थापक जामनेर सौ माधुरी ताई कुलकर्णी वसुनंदिनी फाऊंडेशन संचिव जामनेर श्री दिलीप बाबुराव गुंजाळ संचिव जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रम लासलगाव याच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दुर्गाताईचे व माईचे लासलगाव पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व विसा स्केटीग अॅकडमिचे कोच शाम सर चौधरी व विद्यार्थी मिञाणे शुभेच्छा दिल्या