
प्रहारचा दणका …प्रहारचे उपजिल्हाप्रमुख संतोषभाऊ गायधनी यांनी नाशिक साखर कारखान्यातील केमिकल पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असल्यामुळे अनेक वेळा कारखान्यांच्या MD ला *प्रहार* तर्फे पत्र व्यवहार केला. पण कारखान्याचे MD उडवाउडवीचे उत्तर द्यायचे. मग संतोष गायधनी यांनी 26 जानेवारीला पळसे ग्रामपालिकेच्या ग्रामसभेत केमिकल युक्तपाणी ग्रामसेवकांना पिण्यासाठी घेऊन गेले आणि ग्रामसेवक शेटेंना धारेवर धरले,तर दुसऱ्याच दिवशी ते पाणी बंद करण्यात आले.तसेच पळसे वार्ड क्रं 6 मधील रस्त्याच्या कडेची झाडी रस्तात आली होती.हा विषय अनेक दिवस सांगुन हि ग्रामपालिका टाळाटाळ करत होती, पण संतोष गायधनी यांनी साफसफाईचा विषय ग्रामसभेत लावुन धरला आणि ग्रामसेवक, सरपंच यांना धारेवर धरलं आणि ग्रामसेवकांना सांगितले की जोपर्यंत रस्तांची साफसफाई होत नाही तोपर्यंत पळसेगावातील वार्ड क्रं ६ मधील एकही नागरिक घरपट्टी भरणार नाही.तेव्हा २-३ दिवसात कामाला सुरुवात केली… त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या आभार मानले