शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिन लासलगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव. शिवसेना लासलगाव च्या वतीने 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सहाय्यक सचिव मंगेश चिवटे व शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांच्या हस्ते लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना बिस्किट , फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंगेश चिवटे साहेब यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी 19 जून 1966 रोजी सर्वसामान्य लोकांच्या न्याय व हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेना स्थापन केली असून लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन जात आहे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे असे प्रतिपादन केले तसेच शिवसेना तालुकाप्रमुख श्री प्रकाश सर्जेराव पाटील यांनी देखील सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कटिबद्ध आहे .
व राहतील तसेच कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मार्गदर्शनाखाली येवला लासलगाव मतदार संघातील वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे अभिवचन यावेळी दिले कार्यक्रम प्रसंगी शिवसेना प्रणित शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश मस्के, उपजिल्हाप्रमुख अनिकेत कुटे , विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष सुरज नाईक, नितेश कोल्हे ,नवनाथ श्रीवास्तव, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे ,डॉ. स्वप्निल पाटील ,सुदर्शन तीपायले ,चिंगू तिवारी ,दिलीप जेऊघाले ,राजू जाधव यांसह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते