जळगाव शहरात पांडेचौकात ८ लाख रुपयांची लुटमारी ; चोरटे फरार

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याची ८ लाख रुपयांची भारलेली थैली घेऊन दोन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना जळगाव शहरात पांडे चौकात घडली आहे.
या संदर्भातील माहिती कि, सिंधी कॉलनीत राहणारे ईश्वर मेघानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे. दररोजचे काम आटोपून ते रात्री ९:३० सुमारास घरी निघाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या बॅगत ८ लाख रुपयांची रोकड मोबाईल, लॅपटॉप, ठेवलेला होता. पांडे डेरी चौकातील राधाकृष्ण मंगल कार्याला जवळ दोन तरुणांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली पिशवी हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. त्यांनी तात्काळ आरडा-ओरडा केल्याने एका तरुणाने त्यांच्या पाठलाग केला. मात्र ते भरधाव वेगाने नेरी नाक्याकडून पुढे पसार झाले. मेघानी यांना लुटणारे तीन चोरटे असून ते दोन दुजाकींवरून आले असल्याचे दिसून आले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच.
अप्पर पोलीस अधीक्षक एम चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह एलसीबीचे प्रमुख ज्येष्ठ निरीक्षक किसनराव नजन पाटील, यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.