ताज्या घडामोडी

नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन द्वारे…..

संपादक सोमनाथ मानकर

नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन द्वारे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील जवळपास 200 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

या निवड चाचनी मधुन नाशिकचा 65 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे 65 खेळाडू मुंबईच्या विरार येथे आगामी 3 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक चे नेतृत्व करणार आहेत.
दरम्यान या निवड स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना त्यांनी जिंकलेले पदक वितरण करण्यासाठी संघटनेने एक विशेष पदक वितरण समारंभ नुकताच नाशिक रोड परिसरातील कदम लाॅन्स येथे संपन्न केला आहे.
या पदक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर,
जागतिक पातळीवरील आयर्न लेडी किताब पटकावणाऱ्या पोलीस नाईक अश्विनी देवरे, कदम लाॅन्स चे संचालक राम कदम, नाशिक रोलर स्केटिंग असोसिएशनच्या सचिव सविता बुलंगे आदी मान्यवर उपस्थित होते.‌ या शिवाय कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा युनिक स्केटिंग क्लब चे संस्थापक अध्यक्ष विवेक नालकर, आणि प्रशिक्षिका दैव्यानी मोहाडकर व संघटनेशी संलग्न अन्य सर्व क्लब चे प्रशिक्षक, विजेत्या स्पर्धकांचे पालक, क्रिडा प्रेमी आदी संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैव्यानी मोहाडकर यांनी केले. तर नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा सचिव सविता बुलंगे यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.