लासलगाव महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव दि. ३ नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व सहकारी शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर श्रीमती दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच मुलींना शिक्षण सुरु झाल्याने आज वर्तमान काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत असे गौरवोद्गार काढले त्यानंतर प्रा.जयश्री पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षणातील योगदान, स्त्री शिक्षण चळवळ, महिला शिक्षणाच्या प्रवर्तक व त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.सुनिल गायकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक बंधु-भगिनी यांचे सहकार्य लाभले.