ओझरच्या शिरीन आकीब शेख यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शिकता आले या लेखाची निवड
संपादक सोमनाथ मानकर

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी 8 मार्च 2021 ला एक स्पर्धा आयोजित केली होती .त्याच जीवनावर एक लेख लिहून पाठवायचा होता. त्या स्पर्धेत ओझरची शिरीन आकीब शेख यांच्या कुटुंबाच्या पाठिंबामुळे शिकता आले या लेखाची निवड झाली. कशासाठी? लिंगभाव समतेसाठी. या पुस्तकात लेख छापून आला .खरं म्हणजे शासनाच्या पुस्तकात लेख येणे म्हणजे खूप मोठी बाब आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे 26/ 11/ 2022 संविधान दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा फार मोठ्या थाटामाटात पार पाडला .त्या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे साहेब, डॉक्टर दीपक पवार साहेब तसेच वंदना खरे मॅडम, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार , तारा प्रभावळकर मॅडम, कुलगुरू जी. एस. पाटील सर ,अंनिस चे कार्यकारी मॅडम मुक्ता दाभोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला .या बरोबरच माझ्या परिवारातील अनमोल सदस्य आणि माझे पती आकीब सलीम शेख यांचे मला सहकार्य लाभले .