
विंचूर पांडुरंग नगर मधील नागरिकांनी दिलेले निवेदन आणि पोलीस टाईम्स न्यूज24×7 व पत्रकार बंधूनी प्रसिद्ध केलेल्या पाठपुराव्याला यश
३० नोव्हेंबर ला प्रसिद्ध झालेल्या बातमीचे सविस्तरपणे वृत्त
बातमीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने जागेवर येऊन रस्त्याची पाहणी केली दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नऊ मीटर रस्त्याचे काम दोन टप्प्यात करून देणार त्यानुसार पहिला टप्प्यात तीन मीटर रुंदीचा पक्का काँक्रीट रोड करण्यात येणार आहे.
तसेच सध्या वापरातील रस्त्यात असलेल्या अडचणी असतील त्या व महावितरण कंपनीचे मेन लाईनचे पोल रस्त्यात आलेले आहेत, त्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून पोल रस्त्यातून बाजूला केले जातील.
तोपर्यंत आधी तीन मीटर रोड असलेल्या मीटर रस्त्याच्या मध्यावर तयार करून उर्वरित सहा मीटर रोड करतांना दोन्ही बाजूने 3-3 मीटर नंतर करण्यात येईल असे सांगितले.
स्थानिक प्रशासनाने आणि ठेकेदार यांनी पांडुरंगनगर येथील रहिवासी यांचा तक्रारीच्या अनुषंगाने सर्व प्रश्न समजून घेऊन त्यांचे समन्वयाने निरसन केले.
समस्या
१) पांडुरंग नगर मधील रहिवासी यांचे म्हणणे आहे की जो नऊ मीटरचा रोड आहे.
०२) नऊ मीटरचा रोड तो पूर्ण मोकळा करणे जेणेकरून भविष्यात ये – जा करण्यासाठी कोणाला अडचण होणार नाही.
प्रशासनाच्या वतीने सरपंच यांनी निवेदनाची दखल घेऊन स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून परिस्तिथीची पाहणी यावेळी केली,व स्थानिकांची रस्ता ची मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यामुळे सध्या एकूण 9 मीटर रस्त्याच्या मध्यावर 3 मीटर पक्का रस्ता तयार होणार असून वाहतुकीचा अडथळा दूर होणार असल्याने प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचे आश्वासन दिल्याने सध्या काम सुरू करणेस ग्रामस्थांनी सहमती दर्शविली व ठरल्याप्रमाणे उर्वरित गोष्टी वेळेत व नियमाप्रमाणे पूर्ण होतील याबाबत प्रशासनाकडून शब्द घेऊन विकास कामाचा मार्ग मोकळा करून दिला.
वरील सहा मीटरचा कच्चा रस्ता तयार करून देणार.
तक्रारीची तात्काळ दखल घेऊन प्रश्न मार्गी लावल्याने पांडुरंग नगर मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधी सरपंच सचिन दरेकर व या विषयाला वाच्या फोडणाऱ्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे आणि पोलीस टाईम्स न्यूज व पत्रकार बांधवांचे आभार मानले.