महिला दिनानिमित्त मैत्री ग्रूप च्या वतीने भव्य रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा आयोजित

रुकडी हातकणंगले रुकडी येथील मैत्री ग्रूप यांच्यावतीने भव्य रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी संकल्प करायचा या हेतूने खास महिलांसाठी , महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला , महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच महिलांना मनमोकळ जगता यावे, अश्या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याचा परिचय व्हावा, महिला सक्षमीकरण कार्यशाळा देखील मैत्री ग्रूप यांच्यावतीने प्रयत्न करत आहेत अशी माहिती अनुक्रमे सौ भारती गायकवाड व प्रभावती गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिल्या तसेच रुकडी गावच्या पोलिस पाटील सौ कविता सोमनाथ कांबळे यांनी आपले. मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपल्या मधील जे काही चांगले गुणधर्म आहेत ते विकसित करून स्वतःला सिद्ध केले पाहिजे तसेच महिलांनी स्वावलंबी बनलं पाहिजे आपण कुठेही कमी नाही आहोत याची प्रचिती करून द्यावी असेही त्या बोलत होत्या,मैत्री ग्रूप चे वैविध्य प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे वक्तव्य केले. तसेच गरीब गरजू व्यक्तींना संसार उपयोगी साहित्य व वस्तू वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपत मैत्री ग्रूप ची वास्तविकता जपत असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे कविता सोमनाथ कांबळे, ( पोलिस पाटील रुकडी), ग्रामपंचायत सदस्या सुजाता रमेश कांबळे, गीता संजय कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष हातकणंगले तालुका, मैत्री ग्रूप अध्यक्षा सौ भारती विजयकुमार गायकवाड, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावती संतोष गायकवाड यांनी केले तर परीक्षक म्हणून रेखा बने मॅडम लाभल्या, तसेच इतर मान्यवर व मैत्री ग्रुप सदस्य उपस्थितीत होत्या,स्पर्धेचे विजेतेपदाचे मानकरी खालील प्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा
अन्विता अरुण जाधव मोठा गट प्रथम क्रमांक
रेवा संतोष गायकवाड लहान गट प्रथम क्रमांक
राजवीर संतोष गायकवाड लहान गट मुले प्रथम क्रमांक
रांगोळी स्पर्धा
श्वेता सोमनाथ कांबळे प्रथम क्रमांक
समीक्षा सोमनाथ कांबळे, द्वितीय क्रमांक
प्रज्वल अभिनंदन कांबळे, तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ बक्षीस आरूष अजित कांबळे
रांगोळी मोठा गट
राशी संतोष गायकवाड , प्रथम क्रमांक
जरीन मुजावर द्वितीय क्रमांक
दिपाली सागर कांबळे, तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ बक्षीस प्रनोती पेटारे बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.