दोन मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सुनसगाव मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे
अधिक माहिती अशी की,
कमलाकर कृष्ण कोळी रा. सुनसगाव ता. भुसावळ यांची मालकीची हिरो होंडा फॅशन प्रो मोटरसायकल क्र. एम एच १९ डीजी ८३९६ चोरी गेली होती.
या बाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यात मा.पोलीस निरीक्षक शिकारे यांनी माहिती मिळाली की आयोध्या नगर रा.१ विशाल गोकुळ राजपूत, हनुमान नगर अयोध्या नगर जळगाव, व २ भूषण उर्फ फलिंगा समाधान पाटील रा. सिद्धिविनायक शाळेजवळ आयोध्या नगर जळगाव, या दोन जणांना मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली.
मा पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदिवे, यांनी दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हिरो होंडा पॅशन प्रो. मोटरसायकल क्र. एम एच १९ डीजी ८३९६, व हिरो ग्लॅमर एम एच १९ बी.वाय ९५७५ अशा ६०,०००/ रु किंमतीच्या दोन मोटरसायकल केली आहे. पुढील तपास सफौ आनंदसिंग पाटील करीत आहे.