कामगारांकडून ठेकेदारला लोखंडी रॉडनी मारहाण, पैसे व मोबाईल लंपास…
नवी मुंबई प्रतिनिधी.

पनवेल शहर पोलिस ठाणे च्या हद्दीत ठेकेदारला त्यांच्याच कामगारांकडून लोखंडी रॉड ने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव. शिवाजी गोविंद राठोड असून त्यांना, कामोठे येथील एम जी एम हॉस्पिटल येथे जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
शिवाजी राठोड ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तूरोरी गावचे रहिवाशी असून, ते पनवेल येथे वास्तव्यास असून त्यांचे सिविल वर्क्स चा व्यवसाय आहे. ते ठेके घेऊन, मजूर लावून काम करत असतात त्यांच्यावर हल्ला करणारे
आरोपी मिथुन चौधरी, संजयकुमार सिंग, रघुनाथ चौधरी आणि धिरज ही चौघे कामाला होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार एक कामाचे रक्कम रु.९७,५०० झाले होते, त्यातील रुपये सात हजार
देण्याचे बाकी होते, व टेक देण्यासाठी फिर्यादी त्यांच्याकडे गेले होते. उरलेले पैसे देण्यास उशीर केला म्हणून त्या चौघांनी राठोड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड त्यांना सांगत होते की तुमचे उरलेले पैसे देण्यासाठीच आलो आहे. पण ते चौघेही न ऐकता राठोड यांना मारहाण करण्यास सुरवात केली. तिघांनी राठोड यांना बांधून ठेऊन रघुनाथ याने झोपडीत असणाऱ्या लोखंडी रॉड ने मारण्यास सुरवात केली, राठोड जखमांनी विव्हळत असतानाही ते मारीत राहिले एवढे करूनही ते थांबले नाही, त्यांनी राठोड यांच्या खिशातील मोबाईल व सात हजार रोख रक्कम घेऊन पळून गेले. राठोड यांचे हात व पाय मोडले असून त्यांच्या डोळ्यांनाही गंभीर इजा झाली आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सदर घटनेची फिर्याद पनवेल पोलिस ठाण्यात दाखल केली असून, चौघेही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३२९,३४२ व ३४ लावण्यात आले असून, पुढील तपास सब – इन्स्पेक्टर श्री. संतोष बळिराम शेटे हे करीत आहे.