जळगाव शहर तांबापुरात फटाके फोडण्याच्या वादावरून एका तरुणाचा खुण
मुख्य संपादक राहुल वैराळ

जळगाव येथील तांबेपुरा भागात आज दोन गटात झालेल्या वादात त्यात एकाच्या खून झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहे.
पेपर प्रमाणे पूर्ण तांबापुर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना नवीन पोलीस अधीक्षकांना हा खून करून जळगाव शहराची ओळख दिले आहे. मयताच्या नातेवांनी दिलेली माहितीच्या वरून जळगाव शहरातील तांबापुरा येथे सिकलकर वाडा भागात राहणाऱ्या संजय सिंग प्रदीप सिंग टाक, (वय-२०) रा. शिरसोली नाका या तरुणाच्या सोमवारी रात्री फटाके फोडण्यावरून वाद झालेला होता.
अधिक माहिती अशी की, आमच्या घरात फटाके फोडून नाये जाब विचारल्याने मोनू सिंग बावरी, सोनू सिंग बावरी, मोहन सिंग बावरी, यांच्यासोबत वाद झाला होता.
आज दिनांक 25 ऑक्टोबर मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संजय सिंग हा घराबाहेर गप्पा मारीत असताना मोनूसिंग बावरी, सोनूसिंग बावरी, मोहनसिंग बावरी, यांनी त्याच्यावर चौपर ने हल्ला केला. संजय सिंग याला वाचवण्यासाठी त्याचे वडील प्रदीप सिंग टाक, भाऊ करण सिंग टाक, काका बलवंत सिंग टाक, गल्लीतील काही व्यक्तींनी व बघ्घा सिंग टाक, यांनी धाव घेतले असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.