ताज्या घडामोडी
स्वराज्य चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कपडे व फराळ वाटप
कोल्हापूर संपादक :

दिवाळी हा ऐश्वर्य समृद्धी धन आणि धान्याची पूजा करण्याचा सण, म्हणजेच आनंदाचा सण याप्रसंगी कोल्हापूर येथील स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर महापालिकाकेतील सफाई कर्मचाऱ्यांना कपडे व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले.
जे गरजू व खरेच वंचित आहेत त्यांना या ट्रस्टच्या माध्यमातून गेली सात वर्ष अशाप्रकारची मदत केली जाते.
कोल्हापूरमधील साने गुरुजी परिसरातील ज्येष्ठ नागरिकाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी स्वराज ट्रस्टचे अध्यक्ष कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. नगरसेवक राजू दिंडोर्ले, सामाजिक कार्यकर्ते विशाल दिंडोर्ले, सरकारी वकील श्रीकांत पवार, सतीश काळे, अमित झगडे, अनिल हळवे यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले