ताज्या घडामोडी

दिवाळी उत्सव कालावधीत आद्य श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री सप्तशृंगी मातेची दर्शन २४ तास सुरू राहणार

संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

 

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार, दि. २७/१०/२०२२ पासून रविवार, दि. १३/११/२०२२ पावेतो दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्र उत्सवात व मागील २ वर्षात कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक यांची संख्या विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळणे हेतूने श्री भगवती मंदिर हे २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे. दरम्यान आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यानच्या कालावधीत भाविकांनी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.