अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासना मार्फत तात्काळ तात्काळ मदत मिळावी, वंचित नेते नागवंशी संगपाल पणाड
लोणार प्रतिनिधी,

अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासना मार्फत तात्काळ तात्काळ मदत मिळावी यासाठी. दिनांक 14 10 2022 रोजी सुलतानपूर येथ मुंबई ते नागपूर या महामार्गावर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,जालना व लोणार रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या मागील काही दिवसांपूर्वी दिनांक नऊ दहा रोजी अचानक सायंकाळी आठ वाजे दरम्यान सुलतानपूर व परिसरात ढगफुटी सदृश्य अति पाऊस पडल्यामुळे घरातील नागरिक व शेतकऱ्यांच्या घरामध्ये तीन ते चार फूट पाणी घुसल्यामुळे अनेक घरांची पडझड झाली असून सदर घरातील जीवन आवश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या लहरी निसर्गाने हिरावून घेतला. यासाठी सुलतानपुरातील नागरिक व शेतकऱ्यांनी नुसकान भरपाई शासनामार्फत मिळवण्यासाठी वंचित नेते नागवंशी संगपाल पणाड यांनी दिनांक दहा दहा दोन हजार बावीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असता या निवेदनामध्ये दिनांक 13 10 2022 पर्यंत ही सुलतानपूर व परिसरातील नुसकानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळाली नाही त्यामुळे दिनांक १०/१०/२२ रोजी च्या निवेदनाची कोणत्याच प्रकारे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे दि.१४/१०/२२ ठीक सकाळी १०: वाजता मुंबई नागपूर महामार्गावर सुलतानपूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनामध्ये प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, शे.अख्तर भाई, मन्नान भाई पटेल , जड्डा शेठ लोणार, भानदास पवार,शेख अमीर ,ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य झाकीर पठाण, मनोहर पनाड,विलास भाई लहाने, ,बबन पनाड,अशोक पनाड, गफ्फार शहा, मुरलीधर नालींदे , राजहंस जावळे, अनिल पवार, शेख.राज ,सुलतानपूर येथे, संजय पवार, राजेश पाटील असंख्य कार्यकर्ते नागरिक व नुकसानग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निर्मला परदेशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, नाईक कॉन्स्टेबल राजेश जाधव,उमेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल उज्वल शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला,
या रास्ता रोको आंदोलनाची वार्ता सोशल मीडिया द्वारे पसरतात एकच खळबळ उडाली असता. मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर लोणार तहसील चे तहसीलदार नदाफ साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी येऊल साहेब मंडळ अधिकारी यांनी नुकसान ग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी.सुलतानपूर येथे भेट दिली
या दरम्यान नुकसान ग्रस्त ताहेरा बी अश्रफ खा,रहिमा बी रहेमान शा. छाया प्रल्हाद कुडके, शे. वासिम शे.कौसर असे नुकसान ग्रस्त नागरिकांना धनादेश चेक द्वारे मदत देण्यात आली असून यावेळी धनादेश चेक मदत देताना आमदार संजय रायमुलकर, डॉ. हेमराज लाहोटी, बळीराम मापारी,
नागवंशी संघपाल पनाड, ग्रामसेवक संतोष शिरसागर, मनोहर भानापुरे, शे.अख्तर भाई, मन्नान भाई पटेल ,जाकीर खा पठाण,अनित्य घेवंदे, पंजाब पनाड,संतोष शिंदे.शे.वसीम व ग्रा.प.कर्मचारी उपस्थित होते.