ग्रामीण रूग्णालय लासलगाव येथील शस्त्रक्रिया गृह साडे चार महिन्यानंतर कार्यान्वित.
मुख्यसंपादक राहुल वैराळ

ग्रामीण रूग्णालय,लासलगाव ता. निफाड येथील शस्त्रक्रिया गृह शेजारी डिलेवरी कक्षाचे नविन काम चालु असल्यामुळे व तसेच पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे पाच महिन्यापासून बंद होते.
याबाबत लासलगाव येथील शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी पदाधिकारी सोबत घेत स्वतः ग्रामीण रुग्णालया मध्ये जाऊन वैद्यकीय अधिकारी समवेत समक्ष पाहणी करून त्याचे निवदेन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारतीताई पवार यांना दिले होते.तसेच परिसरातील रुग्णांना निफाड,नाशिक येथे जावे लागत आहे ही बाब लक्षात आणून दिली होती.
शस्रक्रिया गृहाचे पावसाच्या पाण्याची गळतीची थांबवणे साठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारतीताई पवार यांनी वेळीच दखल घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून तात्काळ दुरुस्ती करण्यात आली.यामुळे परिसरातील गरजु रुग्णांना खूप मोठा दिलासा भेटला आहे.
सध्य स्थितीत शस्त्रक्रिया गृहाची स्वच्छता करून,त्याचा तपासणी अहवाल, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.तो तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आज दि. १२/१० /२२ रोजी शस्त्रक्रिया गृह सुरू करण्यात आले असून कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ बाळकृष्ण अहिरे यांनी दिली.
तसेच यापुढेही कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया व सिझीरियन शस्त्रक्रिया सारख्या शस्त्रक्रिया तसेच इतर स्त्रीरोग व शल्य व अस्थिरोग इत्यादी शस्त्रक्रिया सुरू राहतील .असे आश्वासन
डॉ.बाळकृष्ण अहिरे (-वैद्यकिय अधिक्षक वर्ग -2) व डॉ. स्वप्नील पाटील -वैद्यकिय अधिकारी
भूल तज्ञ् डॉ.अमित धोंगडे यांनी दिले, त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी गणेश भवर, स्टाफ श्रीमती घुसले ., उगले ब्रदर, कनिष्ठ सहाय्यक जोशी, कापसे, राजू जाधव, औषधनिर्माण अधिकारी अहिरे, सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
आज शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, सौ. अश्विनी पाटील, मा.प.स सदस्य उत्तमराव वाघ, तालुका समन्वयक केशवराव जाधव, गट संघटक ह. भ .प. बाळासाहेब शिरसाठ, दशरथ काळे ,रामदास पवार ,सलीम शेख तसेच इतर पदाधिकारी नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता ऑपरेशन गृह सुरू करण्यात आले
शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री खा .भारतीताई पवार, जिल्हा शैल्य चिकित्सक अशोक थोरात सर यांचे ऑपरेशन गृह सुरू झाल्यामुळे आभार मानले आहे.