कादवा चा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ उत्साहात

दिंडोरी : साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा ने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे यंदा ऊस तोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुमारे पाच लाख मेटन ऊस गाळपा चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तरी हंगाम यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे 46 वे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.बॉयलर अग्निप्रदीपन पूजन सौ.व श्री. सूर्यकांत यादवराव राजे सौ. व श्री. योगेश राजराम बर्डे, सौ. व श्री.प्रकाश भिमाजी पिंगळ सौ.व श्री. समाधान बाजीराव गडकरी,सौ.व श्री. संजय संपतराव जाधव यांचे हस्ते झाले.
पुढे
पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी कारखान्याची सध्य स्थितीची सविस्तर माहिती देत साखरेला अपेक्षित भाव व उचल होत नसल्याने साखर उद्योग अडचणीत असतानाही कादवा ने एफआरपी अदा केली आहे.
ऊस तोडीचे योग्य नियोजन करत प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊस तोड करण्यात येईल असे सांगितले. केंद्र सरकारने इथेनॉल ला प्रोत्साहन दिले असून कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्या त्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्या असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे ऊस हे शाश्वत पीक असून सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी कामगारांची आरोग्य तपासणी चे चाचणी अहवालाचे वाटप करण्यात आलेयावेळी विश्वासराव देशमुख,जयराम डोखळे,विठ्ठलराव संधान ,राज्य बँक अधिकारी माधव पाटील,युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी विचार मांडले. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, दत्तात्रेय जाधव, बाकेराव जाधव , त्रंबक संधान,भाऊसाहेब पिंगळ,बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, सुरेश बोरस्ते, विलासराव कड, शेखर देशमुख, रामनाथ पाटील, भास्कर भगरे,डॉ.योगेश गोसावी बाजीराव पाटील, गुलाब तात्या जाधव, चिंतामण पाटील,राजेंद्र खराटे, बाबुराव डोखळे, बाजीराव बर्डे, हिरामण गणोरे,प्रभाकर बारहाते, पंढरीनाथ संधान,बापूराव पाटील, बबनराव देशमुख, प्रवीण संधान,छबू मटाले,भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब सरोदे, गणपतराव सरोदे, वसंतराव देशमुख, विष्णुपंत केदार, पांडुरंग गडकरी, वसंतराव मोगल, अशोकराव देशमुख, खंडेराव दळवी, शिवाजी दळवी, अरुण देशमुख आदींसह सर्व संचालक सभासद चीफ इंजिनियर खालकर साहेब, चिफ केमिस्ट भांबरे साहेब व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले कार्यकारी संचालक हेंमत माने यांनी आभार मानले. सूत्रसंचलन अशोक शिंदे यांनी केले.