शिवसेनेच्या मागणीची तात्काळ दखल लासलगाव बाजार समिती कडून मोफत वजन मापा करिता खाजगी भुईकाट्याची व्यवस्था.
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव..
आशिया खंडात नंबर एकची बाजार समिती असा नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समिती मधील मुख्य आवरातील इलेक्ट्रॉनिक भुईकाटा गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त असल्यामुळे बंद आहे,यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबतची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उप निबंधक सतिष खरे यांना दिले होते.तसेच त्या निवेदनाची दखल सर्वच वर्तमान पत्रांनी घेतली होती.
जिल्हा उप निबंधक यांनी तात्काळ लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना आदेश करून शेतकरी बांधवांची व धान्य,कांदा व्यापारी वर्गाची अडचण दूर करायला सांगितले होते.
दरम्यान बाजार समितीने दि.०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या सदस्य मंडळ सभेतील निर्णयाप्रमाणे सदरचा ३० मे. टन क्षमतेचा इलेक्ट्रॉनिक -नि -मॅकेनिकल पद्धतीचा जुना नादूरुस्त असलेला भुईकाटा काढुन त्याऐवजी ८० मे. टन क्षमतेचा नविन डिजीटल इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बसविणेचा निर्णय घेतलेला आहे.त्यादृष्टीने बाजार समिती विविध कार्यपद्धतीचा अवलंब करुन खात्याच्या मान्यतेने सदरचा नविन भुईकाटा एक ते दिड महिन्याच्या कालावधीत कार्यान्वीत करणार आहे. सदर कालावधीत शेतकरी बांधवांची वजनमापासाठी गैरसोय होऊ नये म्हनुन बाजार समितीने लासलगांव मुख्य बाजार आवाराचे शेजारील विंचूर रोडवरील न्यु साई वे ब्रिज हा भुईकाटा शेतकरी बांधवांच्या व व्यापारी वर्गाच्या शेतमाल वजनमापासाठी पर्यायी व्यवस्था म्हणुन भाडेतत्वावर घेतला असुन सदर भुईकाट्यावर शेतकरी बांधवांच्या शेतीमाल वाहनांचे विनामुल्य वजनमाप करुन देण्यात येणार आहे. असे आशयाचे लेखी पत्र शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांना बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिले आहे भुई काटा सुरू झाल्यामुळे पुनःश्च लासलगाव बाजार समितीमध्ये धान्य आवक वाढणार असून शिवाय खाजगी भुईकाट्यावर मोजमाप करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा नाही.आता त्यातून सुटका होणार असून शेतकरी बांधवांचा व व्यापारी दोन्ही घटकांना यांचा फायदा होणार आहे.
बाजार समितीच्या या निर्णयाबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप ,शहर प्रमुख प्रमोद पाटील ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब छत्र होळकर मा.प.स सदस्य उत्तम राव वाघ, तालुका समन्वयक केशवराव जाधव , फिरोज मोमीन .ह.भ. प. बाळासाहेब शिरसाट शेतकरी बांधवांनी जिल्हा उप निबंधक सतिष खरे सो , निफाडचे सहाय्यक निबंधक रणजित पाटील सो,लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांचे आभार मानले