महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या………..
संपादक सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.मा.श्री.श्रीकांत शिंदे साहेब व मा.श्री.मंगेशजी चिवटे सर (विशेष क्रार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री साहेब) व राम हरिजी राऊत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर सेल, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज धोडांबे गाव,ता.चांदवड,जि. नाशिक येथे मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया,मोफत औषधी वाटप व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी स्त्री रोग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ,नेत्ररोगतज्ञ, हृदयरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, किडनी रोगतज्ञ, मेंदू रोग तज्ञ असे एकूण ११ डॉक्टर्स उपस्तीत होते
याप्रसंगी ११६५ गरजू रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यातून ७६ मोतीबिंदू, ७ गंभीर शस्त्रक्रिया, १२ संधेरोपण शस्त्रक्रिया निदान झाले या सर्व शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी बच्छाव सर, उत्तर महाराष्ट्र युवासेना प्रमुख आविष्कारजी भुसे, उत्तर महाराष्ट्र कक्ष प्रमुख तथा नवनिर्वाचित युवा सेना जिल्हाप्रमुख मा.श्री.योगेश लक्ष्मण म्हस्के, श्री निलेश देशमुख सर उपस्थित होते.
मोफत शिबिराचे आयोजन:- श्री.प्रथमेश गुलाबराव पाटील (डॉक्टर सेल नाशिक जिल्हा कक्ष प्रमुख-शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष) व श्री.धीरज भालेराव (डॉक्टर सेल तालुका समन्वयक चांदवड) व धोडांबे ग्राम पंचायत समिती यांनी केले होते.तसेच या कार्यक्रमासाठी सर्व डॉक्टर नर्स कंपाउंडर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते