आर पी आय खरात गट कामगार आघाडी तालुका अध्यक्ष पदी श्री संतोष कोठावळे यांची निवड

हातकणंगले तालुक्यातील मजले येथील श्री संतोष कोठावळे यांची आर पी आय खरात पक्षाच्या हातकणंगले तालुका कामगार आघाडी अध्यक्ष पदी आज हातकणंगले तालुका शासकीय विश्राम गृह हातकणंगले येथे निवड पत्र आज दिनांक 11/2/2024 रोजी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री हर्षदकुमार कांबळे, व तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी हर्षदकुमार कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यात खरात गट अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली तसेच जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे यांनी देखील स्वागत केले व खरात पक्षाची ताकद हातकणंगले तालुका व शिरोळ तालुक्यात खंबीर नेतृत्व करून पक्षाचे ध्येय समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचणे आहे तसेच येत्या काळात लोकसभा निवडणुकीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाठिंबा देवून सतेत सहभागी होवून पक्ष बळकटी साठी प्रयत्न करत आहोत, यावेळी उपस्थित कार्यकारिणी सदस्य समीर कांबळे, सुरेश शिंदे, संतोष कोठावळे,सुबोध कांबळे